शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अभिमानास्पद! प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी परीक्षेत कोल्हापूरचा जुबेर मकानदार राज्यात सातवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 12:28 IST

जुबेर याने सन २०१९ मध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर परीक्षा दिली. मात्र, १७ गुणांनी त्याचे निवड यादीतील स्थान हुकले. त्यावर त्याने जिद्दीने तयारी करून सन २०२० मध्ये या परीक्षेसाठी पुन्हा अर्ज भरला.

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर ( सिव्हिल जज्ज जुनिअर डिव्हिजन) या परीक्षेत कोल्हापूरच्या जुबेर शब्बीर मकानदार या २६ वर्षीय युवकाने राज्यात सातवा, तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर येथे सध्या जुबेर वकिली करीत आहे.येथील कदमवाडी परिसरातील डॉ. हिंदुराव घाटगे कॉलनीत राहणाऱ्या जुबेर याने सन २०१९ मध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर परीक्षा दिली. मात्र, १७ गुणांनी त्याचे निवड यादीतील स्थान हुकले. त्यावर त्याने जिद्दीने तयारी करून सन २०२० मध्ये या परीक्षेसाठी पुन्हा अर्ज भरला. त्यावर्षी ७४ पदांसाठी एमपीएससीने मार्चमध्ये पूर्व परीक्षा घेतली. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये मुख्य परीक्षा, तर यावर्षी दि. १७ मार्च रोजी मुलाखती होऊन दि. २४ मार्च रोजी एमपीएससीने निकाल जाहीर केला. त्यात जुबेर याने राज्यात सातवा क्रमांक मिळविला.त्याने सेंट झेवियर्समधून शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे शहाजी लॉ कॉलेजमधून एलएलबी आणि पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज येथून त्याने एलएलएमची पदवी घेतली. त्याची सन २०१८ मध्ये शहाजी लॉ कॉलेजच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड झाली होती. ॲड. शब्बीर मकानदार यांचा तो मुलगा असून कोल्हापुरातील प्रख्यात मोटार मेकॅनिक बाबूराव मकानदार यांचा नातू आहे. जुबेर याला आई वहिदा आणि बहीण नाझिया यांचे पाठबळ, तर गणेश शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले.

न्यायाधीश होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नियोजनबद्ध अभ्यास करून हे यश प्राप्त केले. यश मिळविण्यासाठी आधी पाया पक्का करणे महत्त्वाचे आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत हे गुण आत्मसात केल्यास स्पर्धा परीक्षेत निश्चितपणे यश मिळविता येते. -जुबेर मकानदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयexamपरीक्षाMPSC examएमपीएससी परीक्षा