जि.प. वर्ग ३ च्या उद्या,परवा समुपदेशनाने बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST2021-07-21T04:18:12+5:302021-07-21T04:18:12+5:30
कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांच्या उद्या आणि परवा म्हणजेच गुरुवार आणि ...

जि.प. वर्ग ३ च्या उद्या,परवा समुपदेशनाने बदल्या
कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांच्या उद्या आणि परवा म्हणजेच गुरुवार आणि शुक्रवारी बदल्या होणार आहेत. यासाठी नियोजन करण्यात आले असून, राजर्षी शाहू सभागृहात ही प्रक्रिया होणार असून याचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्यासह पदाधिकारी व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २२ जुलै रोजी सकाळी साडेदहा ते १ पर्यंत सामान्य प्रशासन विभाग, दुपारी २ ते ४ ग्रामपंचायत विभाग आणि दुपारी ४ ते सायंकाळी साडेपाच प्राथमिक शिक्षण विभागाकडील बदल्या केल्या जातील.
२३ जुलै रोजी सकाळी साडेदहा ते १२ या वेळेत आरोग्य विभाग, १२ ते दुपारी दीड अर्थ विभागाकडील सर्व संवर्ग, दुपारी अडीच ते तीन एकात्मिक बाल विकास, दुपारी ३ ते ४ बांधकाम विभाग आणि त्यानंतर पशुसंवर्धन आणि कृषी विभागाकडील बदल्या करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेतून सुमारे १२५ बदल्या होण्याची शक्यता असून सुरुवातीला प्रशासकीय, नंतर विनंती आणि त्यानंतर आपसी अशा क्रमाने या बदल्या होणार आहेत. दिलेल्या वेळेत संबंधित कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी केले आहे.