शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेचे वैद्यकीय पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 13:31 IST

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विशेष वैद्यकीय पथक रवाना झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या उपस्थितीमध्ये हे पथक मंगळवारी रवाना करण्यात आले.

ठळक मुद्देवारकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेचे वैद्यकीय पथकआरोग्य साहाय्यक, सेवक कर्मचाऱ्यांचा समावेश

कोल्हापूर : पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोल्हापूरजिल्हा परिषदेचे विशेष वैद्यकीय पथक रवाना झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या उपस्थितीमध्ये हे पथक मंगळवारी रवाना करण्यात आले.आषाढी यात्रेसाठी वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला चालत जात असतात. सलग १५/२0 दिवस चालल्याने या वारकऱ्यांच्या पायात गोळे येणे, जांघेत गाठ येणे, पाय दुखणे, ताप येणे असे प्रकार होतात; त्यामुळे यावेळी प्राथमिक उपचार आणि साथ प्रतिबंधक सेवा, पोट विकार पाणी शुद्धीकरण तसेच अत्यावश्यक सेवा, संदर्भसेवा आवश्यक असते.गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसांठी आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य पथक पाठविले जाते. जिल्हा परिषद, कोल्हापूरमार्फत आरोग्य पथक पाठविण्यात येत आहे. डॉ. विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखालील पथक नृसिंहवाडी, जयसिंगपूर, मिरजमार्गे पंढरपूरला जाणार आहे, तर डॉ. अरुण गवळी यांच्या नेतृत्वाखालील पथक मिरज, लोणंद, नातेपुते, माळशिरस, वेळापूरमार्गे पंढरपूरला जाणार आहेत. गेल्यावर्षी या पथकांनी सहा हजार वारकऱ्यांवर उपचार केले होते.यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, एम. एम. पाटील. मार्केट यार्ड येथील विठ्ठल मंदिर प्रमुख वारके आण्णा, येवती येथील दिंडीप्रमुख बी. डी. पाटील, रंगा वायदंडे, घुले उपस्थित होते. या पथकामध्ये आरोग्य साहाय्यक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, वाहनचालक या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

वारकऱ्यांच्या वेशात मित्तलयावेळी अमन मित्तल यांच्या कपाळाला बुक्का लावण्यात आला होता. तसेच त्यांना डोक्यावर गांधी टोपी घालायला दिली होती. त्यांच्या गळ्यामध्ये वीणाही देण्यात आली होती. वारकऱ्यांच्या वेशामध्ये मित्तल यांनीही हा आनंद घेतला. 

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर