शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

जिल्हा परिषदेत शुकशुकाटच, निवडणुकीकडील कर्मचारी आज होणार हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:27 IST

लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्याही दिवशी जिल्हा परिषदेमध्ये शुकशुकाट दिसून आला. मुख्यालयात असणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ९0 टक्के कर्मचारी निवडणूक कामावर होते. त्यांना मतदानाच्या दुसºया दिवशी अधिकृत सुट्टी असल्याने अनेक विभागांची कार्यालये ओस पडल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत शुकशुकाटच, निवडणुकीकडील कर्मचारी आज होणार हजर

कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्याही दिवशी जिल्हा परिषदेमध्ये शुकशुकाट दिसून आला. मुख्यालयात असणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ९0 टक्के कर्मचारी निवडणूक कामावर होते. त्यांना मतदानाच्या दुसºया दिवशी अधिकृत सुट्टी असल्याने अनेक विभागांची कार्यालये ओस पडल्याचे दिसून आले.जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात ५५0 कर्मचारी कार्यरत आहेत. यातील सुमारे ५00 कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे आदेश होते. वरिष्ठ १६ अधिकाऱ्यांपैकी १0 हून अधिक अधिकाऱ्यांवरही निवडणुकीची जबाबदारी दिली होती; त्यामुळे अनेक प्रमुख अधिकारी आणि बहुतांशी कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आले.जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी पहाटेचे पाच वाजल्याने आता हे सर्व कर्मचारी गुरुवारीच कामावर येणार आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर अध्यक्षा शौमिका महाडिक आणि अन्य पदाधिकारी अपवादानेच जिल्हा परिषदेत आले होते. आता ही सर्व मंडळी आजपासून जिल्हा परिषदेत दिसतील.जिल्हा परिषद अध्यक्ष दालनाशेजारी गटनेता अरुण इंगवले आणि पक्षप्रतोद विजय भोजे यांचे दालन आहे. सर्वपक्षीय अनेकजण याच दालनात बसून असतात; परंतु गेल्या महिनाभरामध्ये या दालनामध्ये फारसे कुणी न आल्याने येथे नेहमी कडी घातलेली असते. आज, बुधवारी मात्र विजय भोजे, विनय पाटील, सातपुते, प्रवीण यादव, मनोज फराकटे हे शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांच्या दालनामध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत बसल्याचे पाहावयास मिळाले.

अधिकारीही हतबलमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवि शिवदास, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते; मात्र अन्य कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांनाही फारसे काम करता आले नाही. गुरुवारनंतरच या कामाला गती येणार आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकzpजिल्हा परिषदkolhapur-pcकोल्हापूर