शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

 जिल्हा परिषदेची शाळा ते आयपीएस अधिकारी, दिगम्बर प्रधान यांचा लखलखता जीवनप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 12:34 IST

सामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या डॉ.दिगंबर पांडुरंग प्रधान यांना केंद्रशासनाने  भारतीय  पोलिस  सेवेत (आयपीएस) बढती  दिली.  प्रधान  यांचे  मुळ  गांव  कागल  तालुक्यातील  सिध्दनेर्ली.  त्यांच्या  या पदोन्नतीने कुटुंबासह गावालाही आनंदाचे भरते आले. डॉ. प्रधान सध्या ठाणे पोलिस अधिक्षक  (वाहतूक)  म्हणून  जबाबदारी  सांभाळत होते.

ठळक मुद्दे दिगम्बर प्रधान यांचा लखलखता जीवनप्रवाससिध्दनेर्लीतील शेतकरी कुटुंबात आनंदाचे भरते

विश्वास पाटीलकोल्हापूर : सामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या डॉ. दिगंबर पांडुरंग प्रधान यांना बुधवारी केंद्रशासनाने भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) बढती  दिली.  प्रधान  यांचे  मुळ  गांव  कागल  तालुक्यातील  सिध्दनेर्ली.  त्यांच्या  या पदोन्नतीने कुटुंबासह गावालाही आनंदाचे भरते आले. डॉ. प्रधान सध्या ठाणे पोलिस अधिक्षक  (वाहतूक)  म्हणून  जबाबदारी  सांभाळत होते.कुणालाही अभिमान वाटावा असाच प्रधान यांचा जीवनप्रवास आहे. त्यांचे वडिल हे हाडाचे शेतकरी. तशी शेतीही जेमतेमच. चुलते दामोदर गुरव हे आदर्श शिक्षक. आपल्या कुटुंबातील मुले चांगली शिकली पाहिजेत असा त्यांचा आग्रह.  शिक्षणाचे  महत्व  जाणून  त्यांनी  प्रधान (नंतर आडनांव बदलले) यांना जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर निवासी शाळेत पाचवीला घातले. तेथून त्यांच्या आयुष्याची  दिशाच  बदलली. शैक्षणिक गुणवत्तेत कामयच अग्रेसर आणि जीवन  घडविण्यासाठी  वाट्टेल  तेवढे  कष्ट  घेण्याची  तयारी  असल्याने  यशाचे एकेक टप्पे त्यांनी पार केले. 

महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर मिरज वैद्यकीय  महाविद्यालयातून  ते  एमबीबीएस  झाले. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे आरोग्याधिकारी म्हणून त्यांनी आठ वर्षे नोकरी केली. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रात पाचव्या क्रमाकांने उत्तीर्ण होवून ते पोलिस उपअधीक्षक  झाले. 

तासगांव, मिरज,कराड येथे त्यांनी पोलिस उपअधिक्षक म्हणून आपली छाप पाडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी पुणे व नाशिक येथेही काम केले. कोल्हापूरला प्रभारी पोलिस अधिक्षक म्हणूनही त्यांनी कांही महिने  काम  केले. चांगली शारिरीक क्षमता, कमालीचा संयम, अधिकारी असल्याचा गर्व नाही आणि स्वच्छ चारित्र्य  जपत  त्यांनी  केलेल्या  सेवेचे आज चीज झाल्याची प्रतिक्रििया समाजातूनही उमटली.

लष्करी अधिकारी म्हणून मिळाली होती संधी प्रधान महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना लष्करात वैदयकीय शिक्षणाची संधी मिळाली होती, परंतु त्यांनी त्याऎवजी नागरी वैदयकीय सेवेला प्राधान्य दिले व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे चांगली सेवा केली. 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर