शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद स्थायी सभेमध्ये वीज खात्याचे अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 13:05 IST

वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान पंचायत समितीकडे वर्ग करून तेथून लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये चर्चेसाठी आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.

ठळक मुद्देजिल्हा परिषद स्थायी सभेमध्ये वीज खात्याचे अधिकारी धारेवरवैयक्तिक योजना अनुदान तालुक्यातून देण्याचा प्रस्ताव

कोल्हापूर : वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान पंचायत समितीकडे वर्ग करून तेथून लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये चर्चेसाठी आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.विधानसभा निवडणुकीनंतरची पहिली स्थायी सभा सकाळी ११ वाजता समिती सभागृहात सुरू झाली. पहिल्या तासात तीन सुनावण्या झाल्यानंतर विषयपत्रिकेवरील विषय घेण्यात आले. महापुराच्या काळात ज्या डीपी बुडल्या होत्या, त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी वीजखात्याची असताना, ग्रामपंचायती आणि पाणीपुरवठा संस्थांना त्या दुरुस्त करून घेण्यास कसे सांगितले जाते? अशी विचारणा ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी केली. त्यातील तेल बदलण्याची जबाबदारी सरकारची असताना संस्था आणि ग्रामपंचायतींना का भुर्दंड, यावरून उपस्थित अधिकाऱ्यांना सदस्यांनी धारेवर धरले.वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ते पंचायत समितीकडे वर्ग करा आणि तेथून लाभार्थ्याच्या खात्यावर ते जमा करा, असा प्रस्ताव यावेळी चर्चेत आला. याच्या दोन्ही बाजू तपासून निर्णय घेण्याबाबत यावेळी चर्चा झाली. आठवड्यातून एकदा गावागावात ग्रामपंचायतींनी धूरफवारणी करून घेण्याचे बंधन घालण्याची मागणी राजवर्धन निंबाळकर यांनी केली.समाजकल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगासाठीचे ३० टक्क्यांहून अधिक साहित्य येऊन दोन महिने होत आले. तेव्हा त्याचे तातडीने वितरण करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली. याबाबत केंद्रातील संबंधित विभागाची परवानगी घेऊन ज्या तालुक्यात दिव्यांगांची संख्या अधिक आहे, तेथून साहित्य वितरणाला सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली.सभेला उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, महिला बालकल्याण सभापती वंदना मगदूम, जयवंतराव शिंपी, राहुल आवाडे, युवराज पाटील, संध्याराणी बेडगे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषद गजबजलीविधानसभेचा निकाल लागून २० दिवस झाले तरी जिल्हा परिषदेत तुरळक गर्दी दिसत होती. मात्र स्थायी समिती सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा जिल्हा परिषद गजबजल्याचे चित्र दिसून आले. अनेक ग्रामस्थ, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी विविध निवेदने घेऊन पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर