जिल्हा परिषद, पंचायत समिती सभा पूर्वीप्रमाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:39 IST2020-12-16T04:39:08+5:302020-12-16T04:39:08+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सभा पूर्वीप्रमाणे घेण्यासाठी ग्रामविकास विभागाने परवानगी दिली आहे. सामाजिक अंतर राखून या ...

Zilla Parishad, Panchayat Samiti meetings as before | जिल्हा परिषद, पंचायत समिती सभा पूर्वीप्रमाणे

जिल्हा परिषद, पंचायत समिती सभा पूर्वीप्रमाणे

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सभा पूर्वीप्रमाणे घेण्यासाठी ग्रामविकास विभागाने परवानगी दिली आहे. सामाजिक अंतर राखून या सभा घ्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मासिक, विषय समित्यांच्या सभा, सर्वसाधारण सभा घेण्यास मज्जाव करण्यात आला होता. कायद्यानुसार अत्यावश्यक असणाऱ्या सभा व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येत होत्या. यावरून कोल्हापूर जिल्हा परिषदेत आंदोलनही झाले होते.

आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आणि ग्रामीण व डोंगराळ भागामध्ये इंटरनेट कनेक्टिव्ही प्रभावीपणे उपलब्ध होत नसल्याने अनेक जिल्हा परिषदांनी शासनाला पूर्वीसारख्या सभा घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे कोविड-१९ च्या अनुषंगाने नियम पालन करून आणि सामाजिक अंतर ठेवून या सभा पूर्वीप्रमाणे घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: Zilla Parishad, Panchayat Samiti meetings as before