जिल्हा परिषदेचे २१ कोटी रुपये मुख्यमंत्री सडककडे वळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST2021-04-03T04:21:53+5:302021-04-03T04:21:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वाट्याला येणारे २० कोटी ९२ लाख रुपये मुख्यमंत्री सडक ...

Zilla Parishad diverts Rs 21 crore to CM roads | जिल्हा परिषदेचे २१ कोटी रुपये मुख्यमंत्री सडककडे वळवले

जिल्हा परिषदेचे २१ कोटी रुपये मुख्यमंत्री सडककडे वळवले

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वाट्याला येणारे २० कोटी ९२ लाख रुपये मुख्यमंत्री सडक योजनेसाठी वळवण्यात आले आहेत. याबाबत नियोजन विभागाने २३ डिसेंबर २०२० रोजीच शासन आदेश काढला होता. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीने कार्यवाही करत हा निधी जिल्हा परिषदेला वर्ग केलेला नाही.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला हा नियोजित निधी मिळणे अपेक्षित होते. तशी त्या त्या हेडखाली तरतूदही करण्यात आली होती; परंतु नियोजन विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यांना उपलब्ध होणाऱ्या एकूण तरतुदींपैकी १० टक्के निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी शिल्लक ठेवण्याचा आदेश काढण्यात आला होता. राज्यातील ग्रामीण भागात न जोडलेल्या वाड्यावस्त्या जोडण्यासाठी नवीन रस्ते व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अंतभूर्त न झालेल्या इतर ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करो यासाठी प्रधानमंत्री सडक योजनेच्या धर्तींवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यरत आहे.

परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी निधी देणे शक्य नसल्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून १० टक्के निधी देण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांमधील निधीमध्ये खालीलप्रमाणे निधीमध्ये कपात करण्यात आली आहे.

चौकट

१ पशुवैद्यकीय दवाखाने,पशु प्रथमोपचार केंद्रे बांधणे ८५ लाख ४१ हजार रुपये

२ ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान १ कोटी १८ लाख

३ मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी अनुदान ४८ लाख ७५ हजार

४ ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण ४ कोटी ४४ लाख

५ इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण ८ कोटी ५१ लाख

६ लाँच खरेदी अनुदान ९७ हजार

७ यात्रास्थळांच्या विकासासाठी अनुदान ६४ लाख ७२ हजार

८ प्राथ. शाळांच्या दुरूस्तीसाठीचे अनुदान ८१ लाख ९२ हजार

९ दुर्बल घटकांतील मुलींना उपस्थिती भत्ता ४ लाख ५० हजार

१० प्राथ. शाळांच्या बांधकामासाठी अनुदान १ कोटी ६३ लाख

११ अंगणवाडी इमारत बांधकाम २ कोटी २७ लाख

एकूण २० कोटी ९२ लाख ८० हजार रुपये

कोट

अशा पद्धतीने जिल्हा परिषदेचा निधी कपात करणे चुकीचे आहे. राज्यस्तरावरून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी कशाही पद्धतीने निधी उभारता आला असता; परंतु शाळा बांधण्याचा निधी, अंगणवाड्या बांधण्याचा निधी, दुर्बल घटकांतील मुलींचा उपस्थिती भत्त्यामध्ये कपात करायची, ही पद्धत बरोबर नाही.

विजय भोजे

विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद कोल्हापूर

Web Title: Zilla Parishad diverts Rs 21 crore to CM roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.