राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी जाहिद खानची निवड
By Admin | Updated: November 5, 2015 00:52 IST2015-11-05T00:51:41+5:302015-11-05T00:52:19+5:30
हीनिवड चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीतून करण्यात आली.

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी जाहिद खानची निवड
कोल्हापूर : येथील न्यू हायस्कूलचा हॉकी खेळाडू जाहिद फिरोजदाद खान याची १६ ते २० नोव्हेंबरअखेर जालंदर (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कनिष्ठ हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली. जाहिदची ही निवड क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे करण्यात आली. तो संघामध्ये सेंटर हाफ या जागी खेळतो. त्याची हीनिवड चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीतून करण्यात आली. स्पर्धापूर्व सराव शिबिर कांदिवली (मुंबई) येथे ८ ते १२ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. त्याला संस्थेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन वाडीकर, मुख्याध्यापक एस. पी. कणिरे, एम. सी. जयकर, डी. के. गुरव, जिमखाना प्रमुख एच. बी. खानविलकर यांचे प्रोत्साहन, तर हॉकी प्रशिक्षक मोहन भांडवले, प्रदीप पोवार, शासकीय हॉकी मार्गदर्शक उदय पवार यांचे मार्गदर्शन लाभले.