‘युवराज पाटील केसरी स्पर्धा’ आजपासून
By Admin | Updated: April 10, 2015 00:33 IST2015-04-09T23:54:12+5:302015-04-10T00:33:23+5:30
यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे

‘युवराज पाटील केसरी स्पर्धा’ आजपासून
कोल्हापूर : शाहू कुस्त्यांचे मैदान अद्यापही तयार झाले नसल्याने प्राथमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत ‘कुस्तीसम्राट युवराज पाटील केसरी स्पर्धा’ आज, शुक्रवारपासून हुतात्मा पार्क येथील हिरवळीवर तयार केलेल्या आखाड्यात घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा आज व उद्या, शनिवारी स. ८ ते दु. १२ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत.कुस्तीसम्राट स्वर्गीय मल्ल युवराज पाटील यांची स्मृती जपण्यासाठी गेली चार वर्षे ही स्पर्धा घेतली जाते. यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे. मात्र, शाहू खासबाग मैदानाचे नूतनीकरण सुरू असल्याने या स्पर्धा हुतात्मा पार्क येथे घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा २८, ३०, ३२, ३६ आणि ४० किलोगटांत घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण मंडळाचे सदस्य अशोक पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्राथमिक शिक्षण सभापती संजय मोहिते, उपसभापती महेश जाधव, भरत रसाळे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, विजय सुतार, आदी उपस्थित होते.