आंतरशालेय स्पर्धेत युक्ताला सुवर्ण, कांस्य
By Admin | Updated: September 23, 2014 23:54 IST2014-09-23T22:17:31+5:302014-09-23T23:54:10+5:30
कोल्हापूर येथे झालेल्या आंतरशालेय स्पर्धेत

आंतरशालेय स्पर्धेत युक्ताला सुवर्ण, कांस्य
रत्नागिरी : येथील युक्ता जयंतीलाल जैन हिने कोल्हापूर येथे झालेल्या आंतरशालेय स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्ण, तर थाळीफेकमध्ये कांस्य पदक मिळविले आहे. इतर स्पर्धांमध्येही तिने बाजी मारली आहे.
कोल्हापूर येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. सहोदया एथलेटिक्स मीट नावाने भरवल्या जाणाऱ्या या आंतरशालेय स्पर्धेत युक्ता जैनने भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळविले तर थाळीफेकमध्ये कांस्यपदक मिळविले. त्याव्यतिरिक्त इन हाऊस स्पर्धेत थ्रो बॉलमध्ये रजत पदक मिळविले. या स्पर्धेत सी. बी. एस. ई. पाठ्यक्रम असलेल्या शाळांतील १५ संघांनी सहभाग घेतला.
युक्ता बांधकाम व्यावसायिक जयंतीलाल जैन यांची कन्या असून, ती सध्या ती कोल्हापुरातील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववी इयत्तेत शिकत आहे. त्यापूर्वी येथील जीजीपीएस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तिचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे.
युक्ताने आपल्या यशाचे श्रेय शाळेचा शिक्षकवर्ग तसेच आपले आई-वडील यांना दिले आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)