आरक्षण रद्दच्या निषेधार्थ होनेवाडीतील युवकांचे मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:23 IST2021-05-10T04:23:55+5:302021-05-10T04:23:55+5:30

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरविलेबद्दल होनेवाडी (ता. आजरा) येथील युवकांनी सामूहिक मुंडण करत निषेध नोंदविला. राजर्षी शाहू व्यायामशाळेच्या ...

Youths of Honewadi shaved to protest cancellation of reservation | आरक्षण रद्दच्या निषेधार्थ होनेवाडीतील युवकांचे मुंडण

आरक्षण रद्दच्या निषेधार्थ होनेवाडीतील युवकांचे मुंडण

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरविलेबद्दल होनेवाडी (ता. आजरा) येथील युवकांनी सामूहिक मुंडण करत निषेध नोंदविला. राजर्षी शाहू व्यायामशाळेच्या २५ कार्यकर्त्यांनी सामूहिक मुंडण केले.

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय शांततेत निघालेले ५८ मूक मोर्चे व ४२ मराठा युवकांनी या न्याय हक्कांसाठी दिलेले बलिदान या सर्व गोष्टींना तिलांजली देत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरविले. या निर्णयाचा जाहीर निषेध करत होनेवाडीतील राजर्षी शाहू व्यायामशाळेच्या २५ कार्यकर्त्यांनी सामूहिक मुंडण केले.

कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता संसर्ग त्यात शासनाने घालून दिलेल्या नियम अटी व शर्थीचे पालन करत लोकशाही मार्गाने निषेध नोंदवत मराठा समाजाची एकजूट आजूबाजूच्या पंचक्रोशीसह सर्वच गाव खेड्यांनी दाखवावी, असे आवाहनही व्यायामशाळेचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी केले आहे.

-------------------------

फोटो ओळी : होनेवाडी (ता. आजरा) येथील युवकांनी मराठा आरक्षण रद्दच्या निषेधार्थ केलेले मुंडण.

क्रमांक : ०९०५२०२१-गड-०६

Web Title: Youths of Honewadi shaved to protest cancellation of reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.