इचलकरंजीजवळील कोंडीग्रे येथे युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 12:56 IST2017-08-12T12:52:54+5:302017-08-12T12:56:32+5:30

Youth's blood at Kondigre near Ichalkaranj | इचलकरंजीजवळील कोंडीग्रे येथे युवकाचा खून

कोंडीग्रे गावातील रस्त्याकडेच्या चरीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला. जयसिंगपूर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल

ठळक मुद्देआर्थिक देवघेवीतून खून धारदार शस्त्राने खूनविनायक माने खोतवाडी गावचे विद्यमान उपसरपंच कोंडीग्रे गावातील रस्त्याकडेच्या चरीमध्ये मृतदेह

इचलकरंजी, दि. १२ : इचलकरंजीजवळील कोंडीग्रे येथे विनायक माने (वय 35) या खोतवाडी गावचे विद्यमान उपसरपंच यांचा धारदार शस्त्राने खून झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले आहे. आर्थिक देवघेवीतून हा खून झाल्या असल्याची प्राथमिक माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे.


कोंडीग्रे गावातील रस्त्याकडेच्या चरीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला. जयसिंगपूर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता हा मृतदेह खोतवाडी येथील युवकाचा असल्याचे समजले. विनायक माने असे या मृत व्यक्तीचे नाव असून माने हे खोतवाडी गावचे विद्यमान उपसरपंच आहेत.


खोतवाडी गावामध्ये ही माहिती समजताच माने यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी घटनास्थळी दाखल झाले. विनायक माने हे रात्री उशिरा मित्रांसमवेत खोतवाडीजवळच्या कोल्हापूर धाब्यावर जेवण करीत होते. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचे फोनवरुन त्यांच्या आईशीही बोलणे झाले होते. आर्थिक देवघेवीतून हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे. सहायक पोलिस निरिक्षक दत्तात्रय कदम अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Youth's blood at Kondigre near Ichalkaranj