धबधब्यात युवक वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 22:47 IST2017-07-18T22:47:01+5:302017-07-18T22:47:01+5:30

पाचजण बचावले : कोल्हापूरातील उखळू येथील घटना

Youth were shattered in the waterfalls | धबधब्यात युवक वाहून गेला

धबधब्यात युवक वाहून गेला

लोकमत न्यूज नेटवर्क वारणावती (जि. सांगली) : कोल्हापूर जिल्ह्यातील उखळू धबधबा (म्हातारकडा ता. शाहूवाडी) पाहण्यासाठी गेलेल्या सहा जणांपैकी एकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर (वय ३५, रा. बागणी, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता खुदबुद्दीन याच्यासह मेहबूब बाबासाहेब फकीर, दिलीप सदाशिव नगारे, राजेंद्र बाबूराव शेळके, प्रदीप रघुनाथ माळी (सर्व रा. बागणी, ता. वाळवा) व अशोक माळी (साखर कारखान्याजवळ, सांगली) हे उखळू येथील निसर्गरम्य धबधबा पाहायला दुचाकीवरून गेले होते. दुपारी एकच्या सुमारास ते उखळू येथे पोहोचले. त्यातील पाचजण पाण्याच्या प्रवाहात उतरले असताना, पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने खुदबुद्दीन हा प्रवाहाबरोबर वाहून गेला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना बाकीचे पाच जणही वाहून जाऊ लागले. पण प्रसंगावधान राखून सर्वजण डोहात दगडांचा आधार घेऊन व झाडांच्या फांद्या पकडून बसले. खुदबुद्दीनला वाचविताना त्याचा भाऊ मेहबूब जखमी झाला. सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेता आलेला नाही. बुधवारी सकाळी शोधमोहीम सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Youth were shattered in the waterfalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.