डोक्यात बांबू मारल्याने युवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:30 IST2021-09-07T04:30:56+5:302021-09-07T04:30:56+5:30

कोल्हापूर : किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीतून बांंबूने मारहाण केल्याने युवक गंभीर जखमी झाला. विशाल संजय यमकर (रा. सासणे ...

The youth was injured when he was hit in the head with a bamboo stick | डोक्यात बांबू मारल्याने युवक जखमी

डोक्यात बांबू मारल्याने युवक जखमी

कोल्हापूर : किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीतून बांंबूने मारहाण केल्याने युवक गंभीर जखमी झाला. विशाल संजय यमकर (रा. सासणे कॉलनी, धनगरवाडा, लक्षतीर्थ वसाहत) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गु्न्हा दाखल झाला आहे. हा प्रकार रविवारी रात्री उशिरा घडला.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे अशी : चंद्रर आप्पाजी दफडे (वय ४५), सागर विठ्ठल दफडे (२२), बाळू आप्पाजी दफडे (४०, सर्व रा. सासणे कॉलनी, धनगरवाडा, लक्षतीर्थ वसाहत).

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यमकर व दफडे हे दोन्ही कुटुंबे शेजारी राहतात. चंद्रर दफडे हा नेहमी यमकर व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत होता. आम्हाला शिवीगाळ का करता असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संजय जनू यमकर (वय ४०) यांना दफडे यांनी धक्काबुक्की केली. त्यावेळी वडिलांना सोडवण्यासाठी यमकरचा मुलगा विशाल यमकर हा तेथे आला, संशयितांनी त्याला पकडून त्याच्या डोक्यात बांबू मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Web Title: The youth was injured when he was hit in the head with a bamboo stick