जखमी अवस्थेत युवक आढळला
By Admin | Updated: July 22, 2014 22:26 IST2014-07-22T22:25:57+5:302014-07-22T22:26:36+5:30
अधिक माहितीसाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

जखमी अवस्थेत युवक आढळला
कुडाळ : बाव परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळील परिसरात एक अनोळखी युवक जखमी अवस्थेत सापडला असून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे.
ही घटना सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. रेल्वे स्टेशनजवळील बाव येथे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला रेल्वे कर्मचाऱ्यांना एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी याबाबत तत्काळ कुडाळ रेल्वे स्टेशनला माहिती दिली. यानंतर रूग्णवाहिकेशी संपर्क साधून त्याला तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. ही व्यक्ती रेल्वेतून खाली पडल्यामुळेच जखमी झाली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले
आहे. (प्रतिनिधी)