सातारा शहर पोलीस ठाण्यात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: May 8, 2014 12:08 IST2014-05-08T12:08:50+5:302014-05-08T12:08:50+5:30
सातारा शहर पोलीस

सातारा शहर पोलीस ठाण्यात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
सातारा : सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याच्या आरोपावरून पोलीस ठाण्यात आणलेल्या युवकाने टेबलवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजता घडली. अभिजित सतीश चोरगे (वय १८, रा. रविवार पेठ, सातारा) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील जय-विजय टॉकीजसमोर अनिकेत आणि त्याच्यासोबत अन्य एक युवक गोंधळ घालत होते. याच वेळी पोलीस निरीक्षक रवींंद्र पिसाळ आणि कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. या युवकांचा गोंधळ एकून पोलीस तेथे थांबले. तरीही त्यांचा गोंधळ सुरूच होता. त्यामुळे पोलिसांनी अनिकेत आणि त्याच्या मित्राला शहर पोलीस ठाण्यात आणले. एका खोलीमध्ये दोघांनाही खाली बसवण्यात आले होते. त्यावेळी अनिकेतने टेबलवर डोके आपटून पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. या प्रकारानंतर पोलिसांनी अनिकेतला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा (भादवि कलम ३०९) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक ए. के. आवळे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)