युथ सोशल ग्रुपची ‘दशकपूर्ती’उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST2021-07-10T04:18:10+5:302021-07-10T04:18:10+5:30
कोल्हापूर : येथील युथ सोशल पाॅवर ग्रुपच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कोरोना योद्यांचा ...

युथ सोशल ग्रुपची ‘दशकपूर्ती’उत्साहात
कोल्हापूर : येथील युथ सोशल पाॅवर ग्रुपच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कोरोना योद्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या ग्रुपच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी आठ वाजता महापालिका उपायुक्त निखिल मोरे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी पूल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दुपारी लक्ष्मीपुरी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मार्केटच्या बोर्डची रंगरंगोटी करून त्याचे उदघाटन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, अनिल गुजर, संदीप कोळेकर, संतोष घोळवे, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, उद्योजक निरंजन शेटे यांच्या हस्ते कोरोना योद्यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
फोटो : ०९०७२०२१-कोल-करवीर
आेळी : येथील युथ सोशल पाॅवर ग्रुपच्या दहाव्या वर्धापनदिनी शुक्रवारी कोरोनाकाळात सामाजिक काम करणाऱ्या पत्रकार व महापालिका कर्मचाऱ्यांचा करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.