भांडवलदारांविरोधात तरुणांनी एकत्र याव
By Admin | Updated: February 10, 2015 23:55 IST2015-02-10T23:15:36+5:302015-02-10T23:55:59+5:30
बाबूराव गुरव : सडोली खालसा येथे व्याख्याने

भांडवलदारांविरोधात तरुणांनी एकत्र याव
सडोली खालसा : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असणारी लोकशाही राजकीय नेत्यांनी जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण, व्यापारीकरण अशी धोरणे अमलात आणून भांडवलदारांच्या घशात घातली. त्यामुळेच देशातील शेतकरी देशोधडीला लागला व आत्महत्या करू लागला. त्यामुळे शेतीमालाला योग्य हमीभाव मिळण्यासाठी व भांडवलदारांच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी तरुणांनी संघटित होऊन लढा देण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी व्यक्त केले.
ते सडोली खालसा (ता. करवीर) येथील कै. दिनकरराव व शामराव पाटील बंधू शैक्षणिक, कला, क्रीडा संस्थेमार्फत घेतलेल्या ‘लोकशाही व निवडणुकीचे सध्याचे स्वरूप’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीपती पाटील होते.
माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, समाजासाठी रात्रीचा दिवस करणारे कार्यकर्ते तयार करून समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू.
भोगावती साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी केरबा पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील, अशोकराव पाटील, विश्वास खरुटे, अरुण सोनाळकर, पिंटू सूर्यवंशी, बाबासाहेब देवकर, रघुनाथ पाटील, उदयसिंह पाटील, दिनकर कांबळे, डी. पी. कांबळे, समरसिंह पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
५१ हजारांची मदत
आपला जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवणारे जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्या कुटुंबाची आर्थिक ओढाताण होत आहे. त्यामुळे त्यांना माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.