शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: गांधीनगरात किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, चारजणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:59 IST

तीन अल्पवयीन ताब्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

गांधीनगर : किरकोळ कारणावरून शिवीगाळ केल्याने दगड आणि लाकडी बॅटने मारहाण करून सातजणांनी तरुणाचा खून केला. ही घटना गांधीनगर (ता. करवीर) येथे घडली. आशुतोष सुनील आवळे (वय २६, सध्या रा. आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शिताफीने तपास करत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले. शंकर बापू बनसोडे (१९), राजू सचिन काळोखे (२०), शुभम संजय कांबळे (१९), करण महेश डांगे (१८, सर्व रा. गांधीनगर) आणि तीन विधिसंघर्षग्रस्त बालके अशा सातजणांना गांधीनगर (ता. करवीर) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.याबाबत पाेलिसांतून मिळालेली माहिती अशी, रविवारी रात्री उशिरा आपल्या मुलाचा मृतदेह गांधीनगर येथील पंचगंगा नदीच्या काठावर आढळला आहे, अशी माहिती सुनील आवळे यांनी पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह येथील वसाहत रुग्णालयात पाठविला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले. त्यानंतर सुनील यांनी मुलाचा खून झाल्याची फिर्याद साेमवारी पोलिसांत दिली. दरम्यान, पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना देऊन मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सांगितले. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह चार तपास पथके तयार करून तपास सुरू केला. अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कोयना वसाहत येथून करण डांगे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार, करण, मित्र शंकर बनसोडे, राजू काळोखे, शुभम कांबळे आणि इतर तीन विधिसंघर्षग्रस्त बालके शनिवारी (दि. ५) रात्री ११ वाजता मोबाइलवर गेम खेळत होते. त्यावेळी आशुतोष आवळे त्याठिकाणी आला. नशेत असलेल्या आशुतोषने करण यास इथे काय करताय असे विचारत शिवीगाळ केली. तसेच आशुतोषने आपल्याकडील एडका हे हत्यार दाखवून मारहाण करू लागला. त्यामुळे करणने मित्रांसह आशुतोषला दगड, लाकडी बॅटने मारहाण केली. यामध्ये आशुतोषचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर सर्वांनी मिळून पंचगंगा नदीच्या शांतीप्रकाश घाटावर नदीकाठावर त्याचा मृतदेह फेकून दिला. साेमवारी सर्वजण पळून जाण्याच्या तयारीत होते. करण याला घरातून, शंकर, राजू यांना तावडे हॉटेल परिसर येथून, तर शुभम आणि इतरांना गांधीनगर परिसर, कावळा नाका, एस. टी. स्टँड परिसरातून ताब्यात घेतले.