अतुल आंबीइचलकरंजी : येथील भोनेमाळ परिसरातील एका तरुणाचे मोटरसायकल रिपेअरच्या बहाण्याने अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुहास सतिश थोरात (वय १९, रा. भोनेमाळ, इचलकरंजी) असे अपहृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह कर्नाटक–महाराष्ट्र सीमेवरील देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात आढळून आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.सुहास याला शुक्रवारी (ता.५) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी ओंकार अमर शिंदे, ओंकार कुंभार (सर्व रा. लिगाडे मळा, इचलकरंजी) यांसह एक अल्पवयीन असे तिघेजण मोटरसायकल रिपेअर करायची आहे असा बहाणा करून जबरदस्तीने घेऊन गेले. मुलाच्या जीवितास धोका असल्याची भीती वाटल्याने त्याचे वडील सतीश थोरात यांनी याबाबत शुक्रवारीच शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली.दरम्यान, शोधमोहीम सुरू असताना शनिवारी पहाटे देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला. तो मृतदेह सुहास थोरात याचाच असल्याची खात्री पोलिसांनी केली. प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले असून शरीरावर मारहाणीचे व जबर दुखापतीच्या गंभीर खुणा आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. संशयित तीन आरोपींना ताब्यात घेतले असून अपहरणापासून खूनापर्यंतची सर्व श्रृंखला तपासात उघड झाली आहे. सुहासला कुठे नेण्यात आले, खून नेमका कशामुळे झाला, यात आणखी कोणी सामील आहे का याचा तपास सुरू आहे. सुहास थोरातचा निर्घृण खून उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात नातेवाईक व मित्रपरिवाराने गर्दी केली होती.
Web Summary : A youth from Ichalkaranji was abducted on the pretext of motorcycle repair and brutally murdered near Nipani. Police discovered the body and arrested three suspects. The victim, Suhas Thorat, was found with severe injuries. The motive and involvement of others are under investigation, sending shockwaves through the community.
Web Summary : मोटरसाइकिल मरम्मत के बहाने इचलकरंजी के एक युवक का अपहरण कर निपानी के पास बेरहमी से कत्ल कर दिया गया। पुलिस ने शव बरामद कर तीन संदिग्धों को गिरफ्तार किया। मृतक सुहास थोरात गंभीर रूप से घायल पाया गया। मकसद और अन्य की संलिप्तता की जांच जारी है, जिससे समुदाय में सनसनी फैल गई है।