काजिर्णे धरणात बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:26 IST2021-03-16T04:26:04+5:302021-03-16T04:26:04+5:30

मित्रांसोबत धरणावर फिरायला गेले असताना धरणाच्या पाण्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीनानाथ सुरेश कांबळे (वय २१, सध्या रा. ...

Youth drowns in Kazirne dam | काजिर्णे धरणात बुडून युवकाचा मृत्यू

काजिर्णे धरणात बुडून युवकाचा मृत्यू

मित्रांसोबत धरणावर फिरायला गेले असताना धरणाच्या पाण्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीनानाथ सुरेश कांबळे (वय २१, सध्या रा. चंद्रसेन गल्ली, चंदगड, मूळगाव सुळगा, ता. जि. बेळगांव) असे मृत युवकाचे नाव आहे. रविवार (१४) दुपारी ३ ते सोमवार (१५) सकाळी आठच्या दरम्यान काजिर्णे (ता. चंदगड) येथील धरणावर ही घटना घडली.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, दीनानाथ कांबळे हा आपल्या मित्रांसोबत चंदगड शहरापासून काही अंतरावर असलेल्या काजिर्णे धरणावर फिरण्यासाठी गेला होता. तिथे गेल्यानंतर धरणाच्या पाण्यामध्ये पोहत असताना धरणाच्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला.

रविवारी (१४) दुपारी ३ वाजता तो बुडाल्याचे समजले. त्यावेळी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली होती.

सोमवारी (दि.१५) सकाळी पुन्हा शोध घेतला असता धरणाच्या पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे. गजानन कांबळे (रा. सुळगा, ता. जि. बेळगाव) यांनी याबाबतची चंदगड पोलिसात वर्दी दिली आहे.

--------------------------

* दिनानाथ कांबळे : १५०३२०२१-गड-१५

Web Title: Youth drowns in Kazirne dam