बांधकामावर पाणी मारताना विजेचा शाॅक बसून युवकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:25 IST2021-05-09T04:25:13+5:302021-05-09T04:25:13+5:30
पेठवडगाव : मिणचे येथील पंचवटीनगरात घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा शाॅक बसून युवकाचा मृत्यू झाला. सोहम अनिल मोरे ...

बांधकामावर पाणी मारताना विजेचा शाॅक बसून युवकांचा मृत्यू
पेठवडगाव : मिणचे येथील पंचवटीनगरात घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा शाॅक बसून युवकाचा मृत्यू झाला. सोहम अनिल मोरे (वय १९, मूळ गाव तानग, ता. मिरज, सध्या रा. मिणचे), असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज शनिवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी- तानग येथील अनिल मोरे हा सासुरवाडीत राहण्यास आहे. तो आचारी काम करतो. त्याचे पंचवटीनगरामध्ये दुमजली घर बांधण्याचे काम सुरू आहे. सध्या सुटी असल्यामुळे सोहम हा घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना, त्याला विजेचा धक्का बसला. शेजारी असलेल्या ग्रामस्थांनी पोलीस पाटील संदीप घाडगे यांच्या मदतीने त्याला पेठवडगाव येथील खाजगी रुग्णालयात व नंतर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात नेले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या पार्थिवावर मूळ गावी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. सोहम हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. तो मिरज येथील डाॅ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात १२ वी कला शाखेत शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, असा परिवार आहे.