इचलकरंजीत डेंग्यूमुळे युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:08+5:302021-06-17T04:17:08+5:30

इचलकरंजी : येथील कुडचे मळा परिसरातील २७ वर्षीय युवकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. प्रशांत तगारे असे त्या युवकाचे नाव ...

Youth dies of dengue in Ichalkaranji | इचलकरंजीत डेंग्यूमुळे युवकाचा मृत्यू

इचलकरंजीत डेंग्यूमुळे युवकाचा मृत्यू

इचलकरंजी : येथील कुडचे मळा परिसरातील २७ वर्षीय युवकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. प्रशांत तगारे असे त्या युवकाचे नाव आहे. पालिकेच्या गलथान कारभारामुळे एका युवकाचा बळी गेल्याचा आरोप भागातील माजी नगरसेवकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

येथील प्रभाग क्रमांक २८ व २९ मध्ये डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण अधिक आहेत. १५ जून रोजी रात्री कुडचे मळ्यातील प्रशांत तगारे याचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. याबाबत माहिती समजताच आरोग्य विभागाने तातडीने औषध फवारणीचे व भागातील प्रत्येक घरात पाण्याचे साठे तपासण्याचे काम सुरू केले. यावेळी आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक सागर चाळके यांनी भागात पाहणी करून नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन केले. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. अवधुत आखाडा येथील सारवान बोळ परिसरात बारा डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने भागात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर पालिका प्रशासन औषध फवारणी करण्याचे सोयरसुतक दाखवत आहे. ज्या भागात रुग्ण आढळतात एवढ्याच भागात औषध फवारणी केली जात आहे. त्यामुळे शहरातील अन्य भागात उपाययोजनेबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही. नगरपालिकेकडे सदरची माहिती देऊनही प्रशासनाकडून चालढकल सुरू आहे, अशी तक्रार अनेक नागरिक वारंवार करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी न खेळता त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्रयस्थ नागरिक करत आहेत.

Web Title: Youth dies of dengue in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.