नगररचना कार्यालयात युवकाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:36+5:302021-07-08T04:17:36+5:30

कोल्हापूर : महापालिकेच्या राजारामपुरी नगररचना कार्यालयातील साहित्य विस्कटून अधिकाऱ्यांशी वादावादी करत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत युवकावर गुन्हा नोंद ...

Youth confusion in town planning office | नगररचना कार्यालयात युवकाचा गोंधळ

नगररचना कार्यालयात युवकाचा गोंधळ

कोल्हापूर : महापालिकेच्या राजारामपुरी नगररचना कार्यालयातील साहित्य विस्कटून अधिकाऱ्यांशी वादावादी करत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला. संतोष सदाशिव माळी (वय ३०, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांवर कारवाई न केल्याच्या समजातून त्याने हे कृत्य केले.

संशयित संतोष माळी याचा शेजाऱ्याशी जागेवरून गेले काही दिवस वाद सुरू आहे. हा वाद न्‍यायालयातही गेला आहे. दरम्‍यान, माळी याने शेजाऱ्याने सुरू केलेल्‍या बांधकामाविरोधात नगररचना विभागाकडे लेखी तक्रार केली होती. बुधवारी तो राजारामपुरीतील महापालिकेच्या नगररचना कार्यालयात गेला. त्याने तेथील कनिष्ठ अभियंता मयुरी पटवेगार यांच्याशी वादावादी केली व तक्रार अर्जावर कारवाई का केली नाही, असा जाब विचारला. त्यानंतर त्याने तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत तेथील साहित्य विस्कटले, तसेच महापालिका पेटवून देण्याची धमकी दिली. याबाबत पटवेगार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित माळी याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवला.

Web Title: Youth confusion in town planning office