गडमुडशिंगीपैकी कुर्लेवाडीत युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST2021-08-18T04:31:29+5:302021-08-18T04:31:29+5:30

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील कामगार असलेल्या रोहित बाळासाहेब पाटील (वय २७, रा, गुडमुडशिंगीपैकी कुर्लैवाडी, ता. करवीर) या तरुणाने गडमुडशिंगीमधील ...

Youth commits suicide in Kurlewadi | गडमुडशिंगीपैकी कुर्लेवाडीत युवकाची आत्महत्या

गडमुडशिंगीपैकी कुर्लेवाडीत युवकाची आत्महत्या

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील कामगार असलेल्या रोहित बाळासाहेब पाटील (वय २७, रा, गुडमुडशिंगीपैकी कुर्लैवाडी, ता. करवीर) या तरुणाने गडमुडशिंगीमधील वनखात्याच्या जंगलातील झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी दोनच्यासुमारास हा प्रकार उघडकीस आला. कोरोना काळात कामाची मंदी असल्याने तो त्रस्त होता.

रोहित पाटील सकाळी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामावर जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला. एका फिरस्त्याला दुपारी गडमुडशिंगी वनक्षेत्रातील एका झाडावर तो गळफासासह लटकलेला दिसला. त्याने रोहितचा भाऊ प्रशांत याला याबाबत कळवले. प्रशांतने घटनास्थळी जाऊन पाहिले असता, गळफास घेतल्याचे त्याला दिसून आले. या प्रकाराची माहिती त्याने आपला चुलत भाऊ आनंदा रामू पाटील यांना दिली. आनंदा पाटील यांनी याबाबतची वर्दी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. गुन्हा नोंद करण्याचे काम गांधीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

१७ रोहित पाटील

Web Title: Youth commits suicide in Kurlewadi