पाचगावमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:24 IST2020-12-29T04:24:59+5:302020-12-29T04:24:59+5:30
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अमृत मंडलिक हा गेले काही दिवस निराश होता. सोमवारी सकाळी त्याने आपल्या पाचगावमधील राहत्या ...

पाचगावमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अमृत मंडलिक हा गेले काही दिवस निराश होता. सोमवारी सकाळी त्याने आपल्या पाचगावमधील राहत्या घरी छतावरील पंख्याच्या हुकाला ओढणीने गळफास लावून घेतला. घरी आई असल्याने तिच्या ही बाब लक्षात आली. तिने आरडाओरडा केल्यानंतर त्याला तातडीने सोडवून बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केेले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याने कोल्हापुरातील काही दैनिकांत पत्रकार म्हणून सेवा बजावली आहे. त्याशिवाय तो उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू होता. दोन दिवसांपूर्वी पाचगाव मार्गावर दुचाकी अपघातात त्याला व त्याच्या मित्राला काहींनी मारहाण केल्याचे समजते. त्यातून त्याच्या डोळ्यानजीक गंभीर दुखापत झाल्याची माहिती पुढे आली आहे, त्या घटनेपासून तो निराश होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.
फोटो नं. २८१२२०२०-कोल- अमृत मंडलिक (गळफास)