कोगनोळी येथे युवकाची गळफासाने आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST2021-06-02T04:20:23+5:302021-06-02T04:20:23+5:30
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोगनोळी तालुका निपाणी येथील लोहार गल्लीत राहत्या घरी प्रवीण लोखंडे ...

कोगनोळी येथे युवकाची गळफासाने आत्महत्या
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोगनोळी तालुका निपाणी येथील लोहार गल्लीत राहत्या घरी प्रवीण लोखंडे यांने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. प्रवीण हा औद्योगिक वसाहत येथे एका कंपनीत काम करत होता. गेल्या चार-पाच महिन्यांपासून तो कामावरही गेला नव्हता. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेला होता. व्यसनाच्या आहारी जाऊनच त्यांने आत्महत्या केली असल्याचे याठिकाणी बोलले जात होते.
घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे अमर चंदनशिव व राजू खानपणावर यांनी पाहणी करून मृतदेह निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
प्रवीणच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.