वाशीतील ‘चेन स्नॅचिंग’प्रकरणी युवकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:25 IST2021-02-10T04:25:02+5:302021-02-10T04:25:02+5:30

कोल्हापूर : महिन्यापूर्वी शेळकेवाडी, वाशी (ता. करवीर) येथे शेतात जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केलेल्या दोघा चेन ...

Youth arrested in 'chain snatching' case in Vashi | वाशीतील ‘चेन स्नॅचिंग’प्रकरणी युवकास अटक

वाशीतील ‘चेन स्नॅचिंग’प्रकरणी युवकास अटक

कोल्हापूर : महिन्यापूर्वी शेळकेवाडी, वाशी (ता. करवीर) येथे शेतात जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केलेल्या दोघा चेन स्नॅचर संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यापैकी लखन कृष्णात माने (वय २८, रा. वंदूर, ता. कागल) यांना करवीर पोलिसांनी अटक केली तर दुसरा अक्षय पठाडे (रा. कोल्हापूर) हा अद्याप फरारी आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ११ जानेवारीला शेळकेवाडी पोस्ट वाशी (ता. करवीर) येथील शालाबाई पंडित शेळके ही महिला महे रोडवरील शेताकडे जात होत्या, त्याचवेळी दोन अनोळखी युवक दुचाकीवरून येऊन त्यांनी शेळके यांना थांबवून एका शेताचा पत्ता विचारला, त्यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या युवकाने खाली उतरून शेळके यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून घेऊन दुचाकीवरून धूम स्टाईलने पोबारा केला. करवीर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा दुचाकीचालकावर गुन्हा नोंद होता.

दरम्यान, करवीर पोलिसांनी लखन माने याला अटक करून त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले. त्याचा दुसरा साथीदार अक्षय पठाडे हा फरारी आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Youth arrested in 'chain snatching' case in Vashi