गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST2021-09-14T04:28:49+5:302021-09-14T04:28:49+5:30
कोल्हापूर : बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला साने गुरुजी वसाहत परिसरात सापळा रचून अटक केली. अजित सुखदेव ...

गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
कोल्हापूर : बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला साने गुरुजी वसाहत परिसरात सापळा रचून अटक केली. अजित सुखदेव कांबळे (वय २४, रा. लक्ष्मीटेक परिसर, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर), असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत राउंड, असा ५० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात बेकायदेशीर हत्यार बाळगणाऱ्यांना शोधून त्यांच्याकडील हत्यारे, दारूगोळा जप्त करून त्यांच्यावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पो.नि. प्रमोद जाधव यांनी पोलीस पथके नेमून शोध सुरू केला. यावेळी साने गुरुजी वसाहत परिसरात एका मंगल कार्यालयाच्या परिसरात एक तरुण गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती पथकातील पोलीस वैभव पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून तातडीने त्या परिसरात सापळा रचला. यावेळी संशयावरून अजित कांबळे याला पकडले. त्याच्याकडे चौकशी करून अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत राउंड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला मुद्देमालासह जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर केले.
ही कारवाई पो. नि. प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखली सहा. पो. नि. किरण भोसले, पोलीस नेताजी डोंगरे, श्रीकांत मोहिते, वैभव पाटील, उत्तम सडोलीकर, रणजित कांबळे, संजय पडवळ, संतोष पाटील, रणजित पाटील, रफिक आवळकर, तसेच सायबर पोलीस ठाणेकडी, पोलीस अमर वासुदेव यांनी केली.
फोटो नं. १३०९२०२१-कोल-क्राईम०१
ओळ : आरोपीकडून जप्त केलेले गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे.
फोटो नं. १३०९२०२१-कोल-क्राईम०२
ओळ : कोल्हापुरात साने गुरुजी वसाहत परिसरात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी अजित कांबळे याला अटक केली.
130921\13kol_4_13092021_5.jpg~130921\13kol_5_13092021_5.jpg
फोटो नं. १३०९२०२१-कोल-क्राईम०१ओळ : आरोपीकडून जप्त केलेले गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे.फोटो नं. १३०९२०२१-कोल-क्राईम०२ओळ : कोल्हापूरात सानेगुरुजी वसाहत परिसरात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वषेण पथकाने सोमवारी अजित कांबळे याला अटक केली. ~फोटो नं. १३०९२०२१-कोल-क्राईम०१ओळ : आरोपीकडून जप्त केलेले गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे.फोटो नं. १३०९२०२१-कोल-क्राईम०२ओळ : कोल्हापूरात सानेगुरुजी वसाहत परिसरात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वषेण पथकाने सोमवारी अजित कांबळे याला अटक केली.