शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

तरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, कोल्हापुरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठा साठा उघड

By सचिन यादव | Updated: June 9, 2025 18:01 IST

सचिन यादव कोल्हापूर : सिगारेटची जागा आता ई-सिगारेटने घेतली. वेब सिगारेट नाव नवीन नसले तरी जिल्ह्यातील अनेक तरुण या ...

सचिन यादवकोल्हापूर : सिगारेटची जागा आता ई-सिगारेटने घेतली. वेब सिगारेट नाव नवीन नसले तरी जिल्ह्यातील अनेक तरुण या ई-सिगारेटच्या आहारी गेले आहेत. ७५० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत याच्या किमती असून, या सिगारेटच्या विळख्याची व्याप्ती वाढू लागली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील पथक आणि शाहूपुरी पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात साठा असल्याचे उघड झाले आहे.ज्या सिगारेटसारखा धूर होत नाही, अशी सिगारेट म्हणजे ‘ई-सिगारेट’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेट’ ओळखली जाते. तंबाखूजन्य सिगारेट न ओढता तंबाखूत असलेले निकोटिन हे द्रव्य शरीरात घेण्याचा एक मार्ग म्हणून याचा वापर केला जातो. ई-सिगारेट दिसतेही साध्या सिगारेटसारखीच. आता नवीन जी वेब सिगारेट आली आहे ती पेनड्राइव, पेन, लायटरच्या आकाराची आहे. ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे, तर थेट द्रवरूपातले निकोटिन आहे. ही सिगारेट पेटविण्यासाठी लायटर किंवा काडेपेटी लागत नाही, कारण या सिगारेटच्या उपकरणात एका लहानशा बॅटरीचा समावेश असतो.जेव्हा सिगारेट ओढण्याची कृती केली जाते तेव्हा या सिगारेटमधील द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपान केल्यासारखा वास नसतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही. यामुळे सिगारेट ओढल्याची निशाणी राहत नसल्याने महाविद्यालयीन तरुण आहारी जात आहेत.

  • तरुणांना इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे व्यसन
  • शाळा, महाविद्यालयांतील तरुण जाळ्यात
  • तंबाखू नव्हे तर थेट द्रवरूपातील निकोटिन

तरुणाई विळख्यातदुर्दैवाने तरुणाई या व्यसनात गुरफटत आहे. सर्वसाधारणपणे हुक्क्याप्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्सची जत्रा वेब सिगारेटमध्ये असते. आकर्षणापोटी तर कधी मौजमजेसाठी हजारो रुपये खर्चून घेतली जात असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट होत आहे.

धोकादायक द्रव्येद्रव्यरूपातील निकोटिनची विद्युत उपकरणाच्या माध्यमातून वाफ बनवली जाऊन धूम्रपानासाठी वापर केला जातो. यामध्ये ई-सिगारेट, फ्लेवर हुक्का, ई-शिशा आदी निकोटिनयुक्त उपकरणांचा समावेश आहे. हे सर्व शरीराला अपायकारक असलेली द्रव्ये आहेत.

कायद्याने अशा प्रकारच्या ई-सिगारेट वापरावर, विक्रीवर बंदी आहे. त्याची विक्री केल्याप्रकरणी न्यू शाहूपुरीतून एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्या सी झोन दुकानातून चार लाखांचा सिगारेटचा साठा जप्त केला. - संतोष डोके, शाहुपूरी पोलिस निरीक्षकतरुणाईत ई-सिगारेट ओढण्याची स्टाईल बनत चालली आहे. मात्र त्याचा आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका आहे. श्वसनाचे रोग झालेले रुग्ण उपचारासाठी आल्यानंतर ई-सिगारेटच्या आहारी गेल्याचे सांगतात. - डॉ. अशोक पाटील 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस