गांधीनगरमध्ये पेटवून घेत टेरेसवरून उडी मारून युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST2021-08-15T04:26:04+5:302021-08-15T04:26:04+5:30

गांधीनगर (ता. करवीर) येथे अंजुमन मैन्नुद्दीन शेख (वय २१) या युवतीने स्वत:ला पेटवून घेऊन १०० फूट ...

Young woman commits suicide by jumping from terrace in Gandhinagar | गांधीनगरमध्ये पेटवून घेत टेरेसवरून उडी मारून युवतीची आत्महत्या

गांधीनगरमध्ये पेटवून घेत टेरेसवरून उडी मारून युवतीची आत्महत्या

गांधीनगर (ता. करवीर) येथे अंजुमन मैन्नुद्दीन शेख (वय २१) या युवतीने स्वत:ला पेटवून घेऊन १०० फूट टेरेसवरून खाली उडी मारून आत्महत्या केली. अंगावर शहारा आणणाऱ्या या घटनेने गांधीनगर परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात तिचा भाऊ रमजान मैन्नुद्दीन शेख याने वर्दी दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी गांधीनगर येथील साईबाबा मंदिरनजीक एका अपार्टमेंटमध्ये मैन्नुद्दीन शेख राहतात. मैन्नुद्दीन हे अर्धांगवायूग्रस्त असून त्यांची पत्नी गांधीनगरमध्ये धुणीभांडीचे काम करते. त्यांना एक मुलगा रमजान आणि मुलगी अंजुमन आहे. अंजुमन हिने मिरज येथे नर्सिंग कोर्स पूर्ण केला होता. ती नर्स म्हणून कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात काम करीत होती. नोकरीत त्रास होत असल्याने तिने सहा महिन्यांपूर्वीच काम सोडले होते. घरची परिस्थिती बेताचीच आहे. शनिवारी दुपारी भाऊ रमजान कोल्हापुरात कामासाठी गेला होता. तर आई धुणीभांडी करण्यासाठी बाहेर गेली होती. दुपारी दोनच्या सुमारास अंजुमन हिने टेरेसवर जाऊन अंगावर राँकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. त्या स्थितीतच १०० फूट टेरेसवरून खाली उडी मारली. शेजारील कमलेश चंदवाणी यांच्या घराच्या पत्र्यावर पडून पत्रा फुटून घराच्या बेडवर अंजुमन पडली. यामध्ये ती गंभीर जखमी होऊन मृत झाली. मोठा आवाज झाल्याने नागरिक घटनास्थळी आले. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास हे.कॉ. पाटील करीत आहेत.

मयत १४अंजुमन शेख

Web Title: Young woman commits suicide by jumping from terrace in Gandhinagar