शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या गोष्टींच्या ध्यास घेण्याचे व्यसन युवकांनी लाउन घ्यावे : सयाजी शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 17:19 IST

चांगल्या व्यसनाशिवाय माणूस जगू शकत नाही, अथवा यशस्वी होऊ शकत नाही. यासाठी कोणत्याही चांगल्या गोष्टीचा ध्यास घेण्याचे व्यसन युवकांनी स्वत:ला लावून घ्यायला हवे असे मत सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देचांगल्या गोष्टींच्या ध्यास घेण्याचे व्यसन युवकांनी लाउन घ्यावे : सयाजी शिंदे 'आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त' आयोजित फेसबुक लाईव्ह

कोल्हापूर : चांगल्या व्यसनाशिवाय माणूस जगू शकत नाही, अथवा यशस्वी होऊ शकत नाही. यासाठी कोणत्याही चांगल्या गोष्टीचा ध्यास घेण्याचे व्यसन युवकांनी स्वत:ला लावून घ्यायला हवे असे मत सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर यांच्यावतीने बुधवारी 'आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त' आयोजित फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.  जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.  सयाजी शिंदे म्हणाले की, कोणत्याही गोष्टीचे व्यसन अर्थात ध्यास लागल्याशिवाय माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही. आजपर्यंत यशस्वी झालेल्या व्यक्ती यामुळेच यशस्वी झालेल्या आहेत. एचआयव्ही व कोरोना हे विषाणू आहेत. एचआयव्हीच्या नियंत्रणासाठी यापूर्वीही युवक पुढे आलेले आहेत.

सध्या कोरोना विषाणू बाबतीतही  काही गैरसमज आहेत. त्यामुळे कलंक भेदभाव सारख्या घटना घडतात. कलंक व भेदभाव नष्ट करण्यासाठी  युवकांनी पुढाकार घ्यायला हवा. राष्ट्राच्या उभारणीमध्ये युवकांचा सिंहाचा वाटा असून, वृक्षसंवर्धन, वाचन यासारखे छंद जोपासून त्यांचे व्यसन लावून घेऊन, या क्षेत्रांमध्येही युवकांनी अग्रेसर व्हावे. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर म्हणाल्या, एच. आय. व्ही. मध्ये युवक हा महत्त्वाचा घटक आहे. एचआयव्ही संसर्गितांमध्ये युवकांची संख्या ही लक्षणीय आहे १५ ते ४९ हा गट महत्त्वाचा मानला जातो. युवकांनी याबाबत सजग राहून शास्त्रीय माहितीचा आधार घेण्याची आवश्यकता आहे.  मकरंद चौधरी, विनायक देसाई, संदीप पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. 

टॅग्स :sayaji shindeसयाजी शिंदेCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर