शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिगरबाज तरुणांनी जपली माणुसकी; पुराच्या पाण्यातून खांद्यावरून नेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 18:44 IST

पुराच्या पाण्यात सापडले होते अनोळखी प्रेत

ठळक मुद्देप्रेत गोणपाटामध्ये बांधून त्या तडकीवरून खांद्यावरून पुराच्या पाण्यातून मुरगुडकडे नेण्यास सुरवात केली. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरल्यानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली.

अनिल पाटील  मुरगूड - यमगे ता. कागल येथे निपाणी राधानगर रस्त्यावर आलेल्या पुराच्या पाण्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला.उत्तरीय तपासणीसाठी मुरगूड च्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठी ऐनवेळी कोणतेही वाहन उपलब्ध होत नाही हे पाहून गावातील काही जिगरबाज तरुणांनी लोखंडी तडकी वरून यमगे पासून मुरगूड पर्यंत सुमारे दोन किलोमीटर अंतर सुमारे पाच फूट पाण्यातून खांद्यावरून हा मृतदेह नेला. अनोळखी प्रेताप्रती या तरुणांनी माणुसकीच नातं जपत पोलीस प्रशासनाला केलेली मदत नक्कीच कौतुकास्पद आहे.याबाबत अधिक माहिती अशी वेदगंगेला आलेल्या महापुराचे गेल्या आठ दिवसापासून निपाणी राधानगर हा रस्ता पूर्ण पणे बंदच आहे. या रस्त्यावर यमगेपासून निढोरीपर्यंत सुमारे तीन किलोमीटर रस्त्यावर सरासरी सात फूट पाणी होते. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पाणी झपाट्याने उतरत आहे. आज यमगे शिंदेवाडी दरम्यान यमगेकडील बाजूस शिवच्या पुलाजवळ पुराच्या पाण्यात एक मृतदेह तरंगत असलेला काही युवकांना दिसला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरल्यानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली.

पोलिसांना ही माहिती मिळताच तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोहचले.तो मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.त्याची उत्तरीय तपासणी करण्यासाठी तो मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाणे आवश्यक होते.यासाठी गावात एखादे वाहन सापडते का याचा शोध पोलीस कर्मचारी घेत होते.सुमारे शंभर हुन अधिक ट्रॅक्टर,ट्रक आदी वाहने असताना ही अनेकांनी मृतदेह नेण्यास नकार दिला.याबाबत गावचे सरपंच आणि पंचायत समिती सदस्य विजय भोसले याना फोन वरून पोलिसांनी ही माहिती दिली.तरी ही बराच वेळ कोणत्याच वाहनांची सोय झाली नाही.शेवटी घटनास्थळावर असणारे पोलीस पाटील किरण भाट, प्रमोद पाटील सरनोबत,अनिल मारुती पाटील, सुशील पाटील, वैभव पोवार, आकाश चावरे, सूरज कोंडेकर, महेश परीट आणि युवराज पाटील या तरुणांनी गावातील लोखंडी तडकी आणली. प्रेत गोणपाटामध्ये बांधून त्या तडकीवरून खांद्यावरून पुराच्या पाण्यातून मुरगुडकडे नेण्यास सुरवात केली. सुरवातीला पाणी कमी होते पण शिंदेवाडी जवळील ओढ्यावर सुमारे छाती एवढ्या पाण्यातून सदरचा मृतदेह सुमारे दोन किलोमीटर चालत मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी या तरुणांच्या बरोबर सहाय्यक फोजदार मधकुर पाटील, स्वप्नील मोरे हे पोलीस कर्मचारी होते.पाण्यामुळे सडल्याने मृतदेहाला दुर्गंधी सुटली होती.पण कशाची ही तमा न बाळगता या तरुणांनी अत्यन्त धाडसाने या अनोळखी मृतदेहाला खांदा देत जपलेले माणुसकीच नात अनेकांच्या डोळ्यात अंजन घालून गेलं.एकीकडे मृतदेह न्यावा लागेल म्हणून घटनास्थळावरून पळून गेलेले ट्रॅक्टर आणि टेम्पो चालक तर गावातील अनेक वाहन चालकांनी दिलेला नकार यामुळे वैतागलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्याच गावातील या तरुणांची माणुसकी बघून आश्चर्य वाटले.

टॅग्स :floodपूरDeathमृत्यूPoliceपोलिस