तरुणाने सासुरवाडीतच घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST2021-09-14T04:29:36+5:302021-09-14T04:29:36+5:30

कोल्हापूर : येथील सदरबाजारमध्ये तरुणाने सासुरवाडीतील घरातच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. गोविंद भीमराव सरीकर ...

The young man took the gallows in Sasurwadi | तरुणाने सासुरवाडीतच घेतला गळफास

तरुणाने सासुरवाडीतच घेतला गळफास

कोल्हापूर : येथील सदरबाजारमध्ये तरुणाने सासुरवाडीतील घरातच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. गोविंद भीमराव सरीकर (वय २८, रा. सदरबाजार हौसिंग सोसायटी, मूळ रा. निंबाळकरनगर, सदरबाजार, कोल्हापूर), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोविंद सरीकर सध्या सासुरवाडीत राहत होता. सोमवारी घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने लाकडी तुळईला ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. सकाळी दहा वाजता घराचा दरवाजा उघडला नसल्याने त्याच्या नातेवाइकांनी घरावर चढून कौले काढून आत प्रवेश केला असता त्याने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याचा भाऊ गणेश भीमराव सरीकर (रा. सदरबाजार) याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फोटो नं. १३०९२०२१-कोल-गोविंद सरीकर

130921\13kol_8_13092021_5.jpg

फोटो नं. १३०९२०२१-कोल-गोविंद सरीकर

Web Title: The young man took the gallows in Sasurwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.