सिरसे येथील अपघातात तारळे खुर्द येथील तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:18 IST2021-07-20T04:18:09+5:302021-07-20T04:18:09+5:30

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मारुती सरावणे हे कामानिमित्त सडोली येथे आज सकाळी ११ वाजता कामानिमित्त जाण्यासाठी मोटारसायकल ...

A young man from Tarle Khurd was killed in an accident at Sirse | सिरसे येथील अपघातात तारळे खुर्द येथील तरुण ठार

सिरसे येथील अपघातात तारळे खुर्द येथील तरुण ठार

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मारुती सरावणे हे कामानिमित्त सडोली येथे आज सकाळी ११ वाजता कामानिमित्त जाण्यासाठी मोटारसायकल घेऊन घरातून बाहेर पडले आमजाई व्हरवडे येथे पेट्रोल पंपावर तेल टाकून पुढे जाण्यास निघाले असता पाचच मिनिटांत सिरसे येथे त्यांच्या मोटारसायकलच्या आडवे कुत्रे आल्याने त्यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने ते जोरात रस्त्यावर आपटले त्यांना डोक्याला जोराचा मार लागल्याने त्यांना खासगी हाॅस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेले असता त्यांचा वाटेतच मृत्यू झाला सीपीआरमध्ये शवविछेदन करून मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे असा परिवार आहे

चौकट

हेल्मेट असते तर प्राण वाचला असता

कुत्रे आडवे आल्याने ते रस्त्यावर जोरात आपटले, त्यामुळे त्यांच्या डोक्याला जोरात मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला जार डोक्याला हेल्मेट असते तर प्राण वाचले असते.

Web Title: A young man from Tarle Khurd was killed in an accident at Sirse