शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

फटाके वाजवल्याच्या रागातून युवकाचा धारदार शस्त्राने खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 11:42 IST

डॉल्बी मोठ्याने लावल्याच्या व फटाके वाजवल्याच्या रागातून गल्लीतील युवकाचा धारदार शस्त्राने खून केला. राहुल तुलसीदास शिवूडकर (वय वर्षे २५) असे त्याचे नाव आहे.गल्लीतील युवकानेच खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एका संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देफटाके वाजवल्याच्या रागातून युवकाचा धारदार शस्त्राने खून यड्राव (ता.शिरोळ) येथील घटना, एक संशयीत ताब्यात

यड्राव : डॉल्बी मोठ्याने लावल्याच्या व फटाके वाजवल्याच्या रागातून गल्लीतील युवकाचा धारदार शस्त्राने खून केला. राहुल तुलसीदास शिवूडकर (वय वर्षे २५) असे त्याचे नाव आहे.गल्लीतील युवकानेच खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एका संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यड्राव ( ता शिरोळ) येथील रेणुकानगर गल्ली नं १ मध्ये प्रत्येक संकष्टीला सामुदायिक आरती व महाप्रसादाचे आयोजन असते. त्याच प्रमाणे गुरुवारी संकष्टी असल्याने गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर फटाके लावून डॉल्बी लावण्यात आली आणि महाप्रसाद वाटप सुरू असताना अविनाश नर्लेकर याने राहुलबरोबर वाद घातला.

वादावादीत अविनाश याने राहुल याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ला होताच वार चुकविण्याचा राहुलने प्रयत्न केला, त्यावेळी तो पडला, ही संधी साधून पुन्हा त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने भोसकण्यात आले. यावेळी आरडाओरड झाल्याने कार्यक्रम ठिकाणी गोंधळ उडाला. जखमी राहुल यास उपचारासाठी इचलकरंजी येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले, परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्यास कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. परंतु रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

गल्ली मध्ये ही वार्ता समजल्यावर शोककळा पसरली . राहुल शिवूडकर हा दिवाणजी कामासही मेंडिंगचे काम करत होता. त्याचा  अविनाश नर्लेकर याच्याबरोबर नवरात्रीपासून किरकोळ कारणावरून वाद होता. पुन्हा संकष्टीच्या निमित्ताने डॉल्बी लावण्याचा वादातून ही घटना घडली.

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल इस्पितळात शवविच्छेदन करण्यात आले. सकाळी मृतदेह घरी आल्यावर नातेवाईकांनी आक्रोश केला. गल्ली मध्ये शोककळा पसरली होती.

यड्राव परिसरात दसऱ्यानंतर खूनाची ही दुसरी घटना घडली आहे.शहापूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक के. एन. पाटील करीत आहेत

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूरfire crackerफटाके