शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: पत्नीशी चॅटिंग; तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण, सहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:52 IST

आठवड्यापूर्वी तुरुंगातून सुटलेल्या गुन्हेगाराकडून प्रकार 

कोल्हापूर : पत्नीशी मोबाइलवर चॅटिंग केल्याच्या रागातून सराईत गुन्हेगार ऋतुराज दत्तात्रय भिलुगडे (वय २५, रा. मोरेवाडी, ता. करवीर) याने पाच साथीदारांच्या मदतीने आदिनाथ कृष्णात कुईगडे (३०, रा. शिंगणापूर, ता. करवीर) याचे अपहरण करून बेदम मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि. २७) रात्री उशिरा घडला. याबाबत अपहृत आदिनाथ याची पत्नी श्रृतिका कुईगडे (२३, रा. शिंगणापूर) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली.ऋतुराज भिलुगडे याच्यासह आकाश उर्फ करण दत्तात्रय भिलुगडे (२८), अक्षय सुरेश भिलगुडे (२८), अभय बाळासाहेब मोरे (२३), इंद्रजित बाबासो मोरे (३१), कुलदीप साताप्पा कोथळे (२८) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ऋतुराज भिलुगडे याला विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्या गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत होता. २० जुलैला त्याची सुटका झाली.दरम्यानच्या काळात आदिनाथ हा ऋतुराजच्या पत्नीला मोबाइलवर मेसेज पाठवून चॅटिंग करीत होता. कारागृहातून आल्यानंतर हा प्रकार पत्नीने ऋतुराजला सांगितला. रविवारी रात्री दहाच्या सुमारास ऋतुराज पाच साथीदारांसह शिंगणापूर येथे आदिनाथच्या घरी गेला. लाथा मारून दरवाजा तोडून ते घरात शिरले. मारहाण करीत जबरदस्तीने त्याला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून घेऊन गेले. कारमध्येच त्याला बेदम मारहाण केली.दरम्यान, आदिनाथच्या पत्नीने करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन पतीचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. मारहाणीत आदिनाथ गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच त्याला वाटेत सोडून अपहरणकर्ते निघून गेले. कातडी पट्टा, काठी, सळई आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने जखमी अवस्थेतील आदिनाथ याला रुग्णालयात दाखल केले.आठवड्यात पुन्हा कोठडीतपोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून रात्रीत सहा आरोपींना अटक केली. अटकेतील सर्वच आरोपी सराईत असून, त्यांच्यावर यापूर्वी मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपी ऋतुराज हा २० जुलैला कारागृहातून सुटला होता. आठ दिवसांत अपहरण आणि मारहाणीच्या गुन्ह्यात त्याची पुन्हा पोलिस कोठडीत रवानगी झाली. सहा जणांना ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. पोलिसांनी गुन्ह्यातील कार जप्त केली.