पॉवर ट्रेलरच्या फण्यात अडकल्याने हणमंतवाडीच्या तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST2021-05-31T04:17:51+5:302021-05-31T04:17:51+5:30

अजित शिंदे हे पॉवर ट्रेलरने उसाच्या शेतात भरणी करण्याचे काम भाड्याने करत होते. पाणद नावाच्या शेतात शनिवारी ते उसाची ...

A young man from Hanmantwadi died after getting stuck in a power trailer | पॉवर ट्रेलरच्या फण्यात अडकल्याने हणमंतवाडीच्या तरुणाचा मृत्यू

पॉवर ट्रेलरच्या फण्यात अडकल्याने हणमंतवाडीच्या तरुणाचा मृत्यू

अजित शिंदे हे पॉवर ट्रेलरने उसाच्या शेतात भरणी करण्याचे काम भाड्याने करत होते. पाणद नावाच्या शेतात शनिवारी ते उसाची भरणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान पाॅवर ट्रेलर मागे घेताना अचानक उचलला गेल्याने अजितचे दोन्ही पाय रोटरच्या फण्यामध्ये अडकले. यात त्यांच्या संपूर्ण शरीराची चाळण झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरात कोणीच नसल्याने ही घटना लवकर कळाली नाही. रात्री उशिरापर्यंत अजित घरी परतला नसल्याने मोठा भाऊ अरुण शिंदे व मुलगा प्रज्ज्वल शिंदे ते ज्या शेतात उसाच्या भरणीसाठी गेले होते तेथे शोधाशोध केली असता अजित हा रोटरमध्ये अडकून रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. ग्रामस्थांना याची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी रोटरमधून त्याचा मृतदेह अक्षरशः ओढून काढला. शरीरात रोटरचे लोखंडी फणे घुसल्याने अजितच्या शरीराच्या चिंध्या झाल्या होत्या. याबाबत करवीर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेचा पंचनामा करून रात्री उशिरा अजित याचा मृतदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यात आला.

काेट : कष्टाळू मुलगा गेल्याने हळहळ

अजित अत्यंत कष्टाळू होता. शेतातील मशागतीची कामे तो पॉवर ट्रेलरने प्रामाणिकपणे करत असल्याने हणमंतवाडी, शिंगणापूर व नागदेववाडी येथे त्याला शेतकरी मशागत, भरणीसाठी अनेक शेतकऱ्यांकडून मागणी होती. त्याचा पॉवर ट्रेलरच्या रोटरमध्ये अडकून अशा पद्धतीने अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत.

फोटो : ३्र० अजित रंगराव शिंदे

Web Title: A young man from Hanmantwadi died after getting stuck in a power trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.