निगवे (खालसा) येथे ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:46 IST2021-02-06T04:46:26+5:302021-02-06T04:46:26+5:30

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, निगवे येथील नावेची पाणंद या रस्त्यावरील अशोक पाटील यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टर-ट्रेलरने मुरूमाचा भराव ...

Young man found under the wheel of a tractor at Nigve (Khalsa) and killed | निगवे (खालसा) येथे ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून तरुण ठार

निगवे (खालसा) येथे ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून तरुण ठार

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, निगवे येथील नावेची पाणंद या रस्त्यावरील अशोक पाटील यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टर-ट्रेलरने मुरूमाचा भराव करण्याचे काम सुरू होते. ट्रॅक्टर मालक मित्र असणाऱ्या संदीप शिवाजी पाटील यांच्यासोबत कृणाल गेला होता. दुपारची वेळ असल्यामुळे संदीप हा ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला किल्लीसह लावून नाष्टा करत होता. त्या वेळेत कृणाल हा संदीप याच्या ट्रॅक्टरवर बसला व त्याने ट्रॅक्टर सुरू केला. गिअरमध्ये असणाऱ्या ट्रॅक्टरने वेग घेतला. त्या वेगात ट्रॅक्टरवरून उडी मारताना कृणाल याचा पाय क्लचमध्ये अडकला व तो मागील चाकाखाली सापडला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. कृणाल हा दूध साखर महाविद्यालय, बिद्री येथे अकरावीच्या वर्गात शिक्षक होता. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ व आजी, आजोबा असा परिवार आहे.

Web Title: Young man found under the wheel of a tractor at Nigve (Khalsa) and killed