पंचगंगा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:07+5:302021-07-18T04:18:07+5:30
कोल्हापूर : पंचगंगा नदीत तोल जाऊन पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाला. अनिकेत ऊर्फ विकी नंदकुमार लोहार (वय २८, रा. ...

पंचगंगा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
कोल्हापूर : पंचगंगा नदीत तोल जाऊन पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाला. अनिकेत ऊर्फ विकी नंदकुमार लोहार (वय २८, रा. साकोली कॉर्नर), असे त्यांचे नाव आहे. मासे पकडण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली. याबाबतची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलीस व नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, साकोली कॉर्नर येथे अनिकेत ऊर्फ विकी लोहार हे कुटुंबासोबत राहत होते. ते सुतारकाम करत होते. कॅरम बोर्ड तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता. शनिवारी दुपारी ते मासे पकडण्यासाठी पंचगंगा नदीघाटावर गेले. त्यावेळी ते तोल जाऊन पाण्यात पडले. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी अग्निशामक दलाला फोन करून कळविले. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी शोधमोहिम घेऊन त्यांना बाहेर काढले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. ते साकोली कॉर्नर येथील महाराष्ट्र सेवा मंडळाचे कार्यकर्ते होत. त्यांच्या पश्चात आई-वडील व दोन विवाहित बहिणी आहेत. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, प्राथमिक तपास सहायक फौजदार निवास पवार व पोलीस रामभाऊ बंडगर हे करीत आहेत.
फोटो नं. १७०७२०२१-कोल-अनिकेत लोहार
170721\17kol_13_17072021_5.jpg
फोटो नं. १७०७२०२१-कोल-अनिकेत लोहार