मुलीच्या वडिलाने धमकावल्याने तरुणांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST2021-05-24T04:23:19+5:302021-05-24T04:23:19+5:30

मुलीच्या वडिलांवर गुन्हा मुरगूड : फराकटेवाडी (ता. कागल) येथे प्रेमप्रकरणातून अभिजित संभाजी फराकटे (वय २५) या तरुणाने विषारी ...

Young man commits suicide after being threatened by girl's father | मुलीच्या वडिलाने धमकावल्याने तरुणांची आत्महत्या

मुलीच्या वडिलाने धमकावल्याने तरुणांची आत्महत्या

मुलीच्या वडिलांवर गुन्हा

मुरगूड : फराकटेवाडी (ता. कागल) येथे प्रेमप्रकरणातून अभिजित संभाजी फराकटे (वय २५) या तरुणाने

विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या मुलीच्या वडिलाने तलवार घेऊन धमकावल्याने आपण भीतीने विषारी औषध प्राशन केल्याचा जबाब संबंधित युवकाने मृत्यूपूर्वी दिला. यामुळे मुलीच्या वडिलाविरोधात मुरगूड पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

अधिक माहिती अशी, फराकटेवाडीतील अभिजित फराकटे याचे त्याच गावातील इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. याची कुणकुण त्या मुलीच्या वडिलांना लागली. त्यानंतर १८ मे रोजी त्या मुलीच्या वडिलांनी हातात तलवार घेऊन अभिजित यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली होती. ‘मी त्याला आता सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. त्यानंतर ते निघून गेले. दरम्यान, अभिजित याने आपले प्रेमप्रकरण आता त्यांना समजले आहे आणि आता ते आपल्याला सोडणार नाहीत, या भीतीपोटी विषारी तणनाशक प्राशन केले.

दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांनी अभिजितला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी उपचार सुरू असताना अभिजित यांनी पोलिसांना वरील जबाब दिला. त्यानंतर या जबाबाच्या आधारे मुलीच्या वडिलांवर गुन्हा नोंद केला. अभिजित फराकटे याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलिसांनी संबंधित मुलीच्या वडिलांना अटक केली असून, सहायक पाोलीस निरीक्षक विकास बडवे अधिक तपास करीत आहेत.

फोटो २३ अभिजित फराकटे

Web Title: Young man commits suicide after being threatened by girl's father