जुना बुधवार पेठेत गैरसमजातून तरुणाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:11 IST2021-01-24T04:11:04+5:302021-01-24T04:11:04+5:30
कोल्हापूर : संशयिताच्या मित्रांना काहीतरी सांगितल्याच्या गैरसमजातून जुना बुधवार पेठेत एकाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत राहुल राजेंद्र काकरे ...

जुना बुधवार पेठेत गैरसमजातून तरुणाला मारहाण
कोल्हापूर : संशयिताच्या मित्रांना काहीतरी सांगितल्याच्या गैरसमजातून जुना बुधवार पेठेत एकाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत राहुल राजेंद्र काकरे (वय २१, रा. डी वार्ड, जुना बुधवार पेठ) हा जखमी झाला असून, त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार अभिषेक अनिल भोसले (पापाची तिकटी, बजाप माजगांवकर तालीमजवळ), सत्यम मुंदडे (रा. शनिवार पेठ), ताहीर शेख (घिसाड गल्ली) या संशयितांविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल व संशयित अभिषेक हे दोघे मित्र आहेत. राहुलने आपल्याबद्दल मित्रांना काहीतरी सांगितल्याचा गैरसमज अभिषेकने करून घेतला. त्यामुळे राहुल राहात असलेल्या घराच्या पार्किंगमध्ये गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास संशयित अभिषेकसह सत्यम, ताहीर यांनी लाकडी दांडक्याने त्याला मारहाण केली. संशयित सत्यम याने हातातील काचेच्या बाटलीने मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार राहुलने लक्ष्मीपुरी पोलिसात दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस नाईक बाटुंगे करत आहेत.