साळोके पार्कमध्ये युवकावर ब्लेडने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST2021-08-17T04:31:07+5:302021-08-17T04:31:07+5:30

कोल्हापूर : येथील साळोखे पार्कमधील बुद्धविहार परिसरात तरुणांवर ब्लेडने हल्ला करून गंभीर जखमी करण्याचा प्रकार घडला. रोहित निखिल चाटले ...

Young man attacked with a blade in Saloke Park | साळोके पार्कमध्ये युवकावर ब्लेडने हल्ला

साळोके पार्कमध्ये युवकावर ब्लेडने हल्ला

कोल्हापूर : येथील साळोखे पार्कमधील बुद्धविहार परिसरात तरुणांवर ब्लेडने हल्ला करून गंभीर जखमी करण्याचा प्रकार घडला. रोहित निखिल चाटले (वय १९, रा. भारतनगर) असे जखमीचे नाव आहे, रविवारी सकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी चौघांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राम भगवान डावरे, लता भगवान डावरे, खंडू दाजी डावरे, विजय वाघमारे ( सर्व रा. भारतनगर, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जखमी रोहित व संशयित डावरे हे एकाच ठिकाणी राहतात. रोहितने किशोर आयरे याचे मोबाइल दुकान चालवण्यासाठी घेतले. रविवारी सकाळी रोहित हा दुकान उघडण्यासाठी गेला होता, त्यावेळी संशयित राम डावरे याने त्याच्यावर पूर्ववैमनस्यातून ब्लेडने हल्ला केला, त्यामध्ये रोहीत जखमी झाला. तर इतरांनी त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चौघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Young man attacked with a blade in Saloke Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.