योग सप्ताह कौतुकास्पद : माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:25+5:302021-06-28T04:17:25+5:30
मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथे कुटुंब प्रबोधन पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांचे वतीने कै. श्रीमती लक्ष्मीबाई धोंडू नारकर चॅरिटेबल ट्रस्ट यांचे ...

योग सप्ताह कौतुकास्पद : माने
मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथे कुटुंब प्रबोधन पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांचे वतीने कै. श्रीमती लक्ष्मीबाई धोंडू नारकर चॅरिटेबल ट्रस्ट यांचे वतीने आयोजित ऑनलाईन योग सप्ताह सदिच्छा समारंभ प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकरावजी नारकर तात्या यांनी आज कोविड महामारीचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात जास्त वाढत असताना प्रत्येक कुटुंब योगयुक्त, रोगमुक्त, स्वस्थचित्त बनविण्यासाठी कुटुंब प्रबोधनने खेड्यातील प्रत्येक कुटुंबासाठी केलेले नियोजन खूप चांगले व कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यापुढेही ही योगसेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करू असे सांगितले. डॉ. सौ. जुई कुलकर्णी यांनी देखील या कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले. योग साधकांच्या वतीने अरुण पाटील यांनी या शिबिरातून मिळालेले योगाभ्यासाचे धडे सांगितले. कार्यक्रमास ट्रस्टचे उपाध्यक्ष पी. व्ही. पाटील, संयोजक उत्तर कोल्हापूर डॉ. बाळकृष्ण होसिंग, शिक्षण विस्तार अधिकारी आर. वाय. पाटील, सरपंच सिताराम सातपुते आदी उपस्थित होते यावेळी योगशिक्षक बाळकृष्ण कालेकर, नवनाथ पाटील, सरदार पाटील, रवींद्र ताम्हणकर, अस्मिता घळसासी (कराड),अनंत झांबरे (पुणे) यांना ऑनलाईन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. उपस्थित मान्यवारांचे आभार सरदार काळे यांनी मानले.