भाजपतर्फे सात मंडळांमध्ये योग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST2021-06-22T04:17:02+5:302021-06-22T04:17:02+5:30
कोल्हापूर : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून शहर भाजपतर्फे सात मंडळांमध्ये विविध ठिकाणी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. ...

भाजपतर्फे सात मंडळांमध्ये योग दिन
कोल्हापूर : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून शहर भाजपतर्फे सात मंडळांमध्ये विविध ठिकाणी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. योग शिक्षकांच्या उपस्थितीत सर्वच ठिकाणी योगाचे महत्त्व, दैनंदिन जीवनात योगसाधना आपल्या शरीराला कशी उपयुक्त आहे, याचे महत्त्व सांगण्यात आले. त्याचबरोबर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच करायची योग साधना असून, रोज करावयाची आसने शिकवण्यात आली. योग शिक्षक रंगराव सूर्यवंशी, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस गणेश देसाई, बालेकिल्ला तरुण सभागृहामध्ये झालेल्या शिबिराला नगरसेवक विजय खाडे उपस्थित होते.
उर्वरित मंडळामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, माजी खासदार धनंजय महाडिक, अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये, चंद्रकांत घाटगे, विजय जाधव, अशोक देसाई, दिलीप मेत्राणी यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते.
२१०६२०२१ कोल बीजेपी ०१
भाजपच्यावतीने कोल्हापूर शहरात सात मंडळांमध्ये योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.