आयसीआरईमध्ये योगा दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST2021-06-23T04:16:22+5:302021-06-23T04:16:22+5:30

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य जयंत घेवडे यांनी केले. प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा. एस्. ए. मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. पतंजली ...

Yoga Day at ICRE | आयसीआरईमध्ये योगा दिन

आयसीआरईमध्ये योगा दिन

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य जयंत घेवडे यांनी केले. प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा. एस्. ए. मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. पतंजली योग समिती भुदरगडचे अध्यक्ष दतात्रय करवळ यांनी विविध योगासने, प्राणायमाची प्रात्यक्षिके करवून घेतली. सुरुवातीला योग प्रार्थना झाली. त्यानंतर योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार विविध आसने आणि प्राणायाममध्ये कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी व ध्यान घेण्यात आले.

कार्यक्रमास योग समितीचे उपाध्यक्ष प्रा. ए. डी. पाटील, प्रा. यू. व्ही. पाटील, प्रा. आर. डी. भोकरे, प्रा. ए. पी. कदम, प्रा. एस. जी. माने, प्रबंधक पी. डी. भोईटे, एस. डी. जाधव, ए. ए. जाधव यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शंभर सूर्यनमस्कार पूर्ण केल्याबद्दल सचिन कळके यांचा सत्कार करण्यात आला. दीपक कुपन्नावर यांनी आभार मानले.

Web Title: Yoga Day at ICRE