शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात योगासनाचे धडे वर्षभर, योगा करणाऱ्यांची संख्या वाढली 

By संदीप आडनाईक | Updated: June 21, 2023 16:52 IST

योग करण्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे

संदीप आडनाईक कोल्हापूर : जगभरात आजचा २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने योगासनाचे महत्त्व सांगणारे अनेक कार्यक्रम आज, बुधवारी कोल्हापुरात होत आहेत; परंतु कोरोनाकाळात योगासनाकडे जितक्या गांभीर्याने पाहिले जात होते, तितक्या गांभीर्याने अजूनही याकडे पाहिले जात नाही. असे असले तरीही वर्षभर अनेकजण याकडे वळलेले आहेत. जिम, रंकाळ्यासारख्या निसर्गरम्य परिसरात योगा करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे.कोल्हापुरात आर्ट ऑफ लिव्हिंग, योगधाम, पतंजली यांसारख्या संस्थांच्या पुढाकाराने योगासनाचे धडे वर्षभर घेतले जातात. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ‘मानवतेसाठी योग’ अशी आहे. योगाच्या विविध शैलींमध्ये शारीरिक मुद्रा, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम आणि ध्यान किंवा विश्रांती यांचा समावेश होतो.योग करण्याचे फायदे : शरीराची लवचिकता, सामर्थ्य, संतुलन आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य हे योगाचे शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत.लवचिकता : योग तुमची हालचाल आणि लवचिकता वाढवण्यास मदत करतो, ज्यामुळे तुमच्या शारीरिक वेदना कमी होण्यास आणि एकूण गतिशीलता सुधारण्यास मदत होऊ शकते.मजबूत स्नायू : योगामुळे मुख्य स्नायूंसह मुद्रा आणि संतुलन सुधारू शकते.तणाव कमी होतो : योगामुळे मन आणि शरीर शांत होऊन तणाव कमी होण्यास मदत होते.झोप सुधारते : योगामुळे शरीर आणि मन शांत होऊन शांत झोप घेता येऊ शकते.ऊर्जा वाढते : योगासने रक्ताभिसरण सुधारून, थकवा कमी करून ऊर्जापातळी वाढविण्यास मदत करतात.वजन कमी होणे : योगाने कॅलरी जाळल्या जातात. चयापचय सुधारते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.मानसिक संतुलन सुधारते : योगामुळे चिंता, नैराश्य आणि तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारते.

प्रांजल रेवंडकर करतात मल्लखांबातून योगसरावप्रांजल रेवंडकर पारंपरिक भारतीय खेळ मल्लखांबचा राष्ट्रीय खेळाडू आहे. गतवर्षी त्याने रंकाळ्याच्या कठड्यावर मयूरासन करून मल्लखांब आणि योगासनांचा सराव करत समन्वय साधला. त्याच्या मते मल्लखांब हे योग आणि जिम्नॅस्टिक्सचे एक अद्वितीय संयोजन आहे. गुरुत्त्वाकर्षणाविरुद्ध खेळला जाणारा हा एकमेव खेळ आहे. या खेळाच्या योगाभ्यासाने सामर्थ्य, लवचिकता आणि संतुलन मिळवण्यासाठी मदत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरYogaयोगासने प्रकार व फायदे