होय, मी प्रेमात आहे!
By Admin | Updated: May 13, 2015 23:33 IST2015-05-13T23:33:25+5:302015-05-13T23:33:25+5:30
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असतानाच रणबीरने मात्र याचा इन्कार केला आहे. मात्र त्याने प्रेमात

होय, मी प्रेमात आहे!
जयसिंगपूर : शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील साखर कारखानदारांनी २१ मेच्या आत थकीत असलेली एफआरपीची रक्कम द्यावी, या मागणीसाठी दत्त, गुरुदत्त, पंचगंगा, जवाहर व शरद या साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाच्यावतीने कारखान्यावर जाऊन निवेदन देण्यात आले. एफआरपीप्रमाणे पहिली उचल न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ‘स्वाभिमानी’ने दिला आहे.
शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील पाच साखर कारखान्यांचे दोन महिने झाले तरीही एफआरपीचे ३१४ कोटी रुपये थकीत आहेत. सन २०१४-१५चा गळीत हंगाम संपला आहे. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे व लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्ठात सापडले आहेत. ऊस साखर कारखान्याला गाळपाला गेल्यापासून १४ दिवसांच्या आत पहिली उचल एफआरपीप्रमाणे देणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही मार्च, एप्रिल व मे महिन्यात गाळप झालेल्या उसाचे बिल अद्यापही साखर कारखान्यांनी दिले नाही. येत्या २१ मे २०१५ पर्यंत संबंधित साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले द्यावीत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच शिरोळ व हातकणंगलेचे तहसीलदार यांना या संदर्भात योग्य कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे.
यावेळी आण्णासो चौगुले, जि. प. सदस्य सावकर मादनाईक, आदिनाथ हेमगिरे, रामचंद्र फुलारे, विठ्ठल मोरे, प्रकाश गावडे, म्हादगोंडा पाटील, भीमगोंडा पाटील, सचिन शिंदे, महेश पाटील, शहाजी गावडे, शिवाजी माने, अरुण मगदूम, संतोष जाधव, सागर चिपरगे, सागर संभूशेटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)