शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा २६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट, नागरिकांसाठी ‘माय प्लँट’ अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:45 IST

कोल्हापूर : वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत सन २०१८-१९ या वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्याकरिता २५ लाख ७७ हजार ८७० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे१ ते ३१ जुलैपर्यंत कार्यक्रम : जिल्हा प्रशासन, वनविभागाकडून तयारी सुरू

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत सन २०१८-१९ या वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्याकरिता २५ लाख ७७ हजार ८७० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याची जिल्हा प्रशासन व वनविभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ११ लाख ५०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट हे प्रादेशिक वनविभागाला देण्यात आले आहे.शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी यंदा २५ लाख ७७ हजार ८७०चे उद्दिष्ट दिले आहे.

यामध्ये प्रादेशिक वनविभागाच्या माध्यमातून ११ लाख ५० हजार, महाराष्टÑ वनविकास महामंडळाच्या माध्यमातून ३ लाख १५ हजार, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ४ लाख ५० हजार, महसूल, आर.टी.ओ., पोलीस, आरोग्य आदी शासकीय कार्यालयांच्या माध्यमातून ४ लाख ६२ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे.यासाठी खड्डे खणण्याचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत रोपे लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी दररोज रोप लागवडीची माहिती आॅनलाईन पद्धतीने भरली जाणार आहे.त्याचबरोबर नागरिकांनाही या योजनेत सहभागी होता यावे यासाठी सरकारने ‘माय प्लँट’ हे अ‍ॅपही विकसित केले आहे. त्यामध्ये नागरिक रोप लागवड करून त्याची माहिती भरू शकतात.या रोप लागवडीची गणतीही शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात होणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत साडेचार लाख रोपे ही ग्रामपंचायतींना जागेवर पोहोच केली जाणार आहेत. त्याचबरोबर लावलेल्या रोपांना डिसेंबरनंतरपाणी देण्याची सोयही करण्यात आली आहे.शेंडा पार्क परिसरात५० हजार झाडे लावणारशेंडा पार्क परिसरातील कृषि महाविद्यालयाच्या जागेवर सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. सध्या दीड फूट रूंद व लांबीचे ३० हजार खड्डे खोदण्यात आले आहेत. दोन खड्ड्यांमधील अंतर ३ मीटर इतके आहे. या ठिकाणी मातीची चाचणी घेऊन कोणती झाडे लावता येतील यासाठी दोन दिवसांत सामाजिक वनीकरण व कृषी महाविद्यालयाच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे.

टॅग्स :forestजंगलkolhapurकोल्हापूर